राहुल गांधी, सोनिया गांधी विरोधातील नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या आरोपपत्राची दखल घ्यायला न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली, दि. १६: नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर पाच जणांविरुद्ध ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीच्या एका न्यायालयानं आज नकार दिला. राऊज ॲव्हेन्यू न्यायालयातले विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी हा निर्णय दिला. मात्र, कायद्याला धरून तपास सुरू ठेवायचा हक्क ईडीला आहे, असंही त्यांनी सांगितलं. आरोपपत्राची दखल घ्यायला नकार देण्याच्या या निर्णयाविरोधात अर्ज दाखल करणार असल्याचं ईडीनं म्हटलं आहे.
Source – AIR
