अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विधानभवन येथे आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न
मुंबई/नागपूर, दि. ३ : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ ते रविवार १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे. १३ डिसेंबर शनिवार आणि १४ डिसेंबर रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अमीन पटेल विधानपरिषद सदस्य अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
