सुनील तटकरेंना धक्का; पुतणे अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर
रायगड: कालच बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. त्या धक्क्यातून सावरण्या आधिच राष्ट्रवादीला नवीन धक्का बसणार असल्याचे कळते. राष्ट्रवादी काँग्रेस चे कोकणातील बडे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी राजकारणात आपलं स्थान भक्कम करून घेतलं. आणि इथेच मग कुटुंबांतर्गत राजकारण सुरू झालं. एका बाजूला खासदार सुनील तटकरे आपली मुलगी अदिती तटकरे यांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्याच्या तयारीत असताना अवधूत तटकरे यांच्या बंडखोरीमुळे निवडणूक नक्कीच चुरशीची होणार यात वाद नाही.
