Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचा शिवसेना प्रवेश

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचा शिवसेना प्रवेश

मुंबई/बार्शी: राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांच्या आउटगोइंगचा सिलसिला काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाही. सध्या हे वारं शिवसेनेच्या दिशेने वाहताना दिसतंय. सचिन आहिर यांच्यानंतर राष्ट्रवादीचे एकेकाळचे कट्टर शिलेदार बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही राष्ट्रवादीला रामराम करत आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधलं. शिवसेना प्रवेशामुळे बार्शीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे कमकुवत झाला आहे.

आज काँग्रेस चे सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने आणि मोहोळच्या नागनाथ क्षीरसागर यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *