“अमली पदार्थ विरोधात कारवाया वाढवणार” – गृहराज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. ८: अमली पदार्थ तस्करी तसेच विक्रीवर आळा घालण्यासाठी विविध उपायोजना करण्यासंदर्भात मंत्रालयात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत अमली पदार्थ नियंत्रण आढावा बैठक घेण्यात आली. त्यानुसार राज्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि खरेदीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाया वाढविण्यात याव्यात असे निर्देश बैठकीत दिले. यावेळी अमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या क्षेत्रीय कार्यालयासाठी जागा शोधणे, त्याठिकाणी कार्यालये सुरू करणे, पदभरती करणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी नियोजन पूर्वक कालबद्ध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना हि कदम यांनी यावेळी दिल्या. तसेच या कृती दलामध्ये तातडीने पदभरती करण्याची कार्यवाही पूर्ण करून ही दले अधिक सक्षमतेने कार्यान्वित करावी, असे निर्देशही दिले.
बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव (कायदा व सुव्यवस्था) अनुपकुमार सिंह, अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, उपसचिव राहुल कुलकर्णी, पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे उपस्थित होते.
