“पर्यावरणपूरक वस्तूंचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी युवकांनी समाजामध्ये जनजागृती करावी” – सोलापूर मनपा आयुक्तांचे आवाहन
सोलापूर, दि. २: पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी युवकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यावतीने सोलापूर महापालिकेच्या आवारात ठेवण्यात आलेल्या सेल्फी विथ पर्यावरण फोटो बुथच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपायुक्त किरणकुमार मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
RP6C.jpeg)
हा सेल्फी फोटो बुथ आजपासून 5 जून या जागतिक पर्यावरण दिनापर्यंत लोकांसाठी सेल्फी काढण्यासाठी उपलब्ध राहील. युवा वर्गामध्ये पर्यावरण सुरक्षा आणि संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

HH2T.jpeg)
कार्यक्रमाला मनपा पर्यावरण विभाग, राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन अधिकारी, कर्मचारी आणि बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
