व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती २४ रुपयांनी झाल्या कमी
मुंबई, दि. ०१: देशातल्या १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती २४ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे. आता व्यावसायिक सिलेंडर दिल्लीत १ हजार ७२३ रुपयांना, मुंबईत १ हजार ६७४ रुपये, कोलकाता १ हजार ८२६, चेन्नईत १ हजार ८८१, बंगळुरूत १ हजार ७९६, नोएडा १ हजार ७२३ आणि चंडीगडमधे १ हजार ७४३ रुपयांना मिळेल. याआधी मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती १४ रुपयांनी कमी झाल्या होत्या.
Source – AIR
