आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती
स्वात्नत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान हे फक्त एक क्रांतिकारक, एक देशाभिमानी, स्वातंत्र्योत्सुक नेता, समाज सुधारक एवढेच नव्हते. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यातला महत्वाचा पैलू म्हणजे ते एक थोर साहित्यिक होते. त्यांनी जवळपास ४२ च्या वर पुस्तकं लिहिली, ज्यात आत्मचरित्र, ऐतिहासिक कादंबऱ्या, क्रांतीकारकांना स्फूर्तिदायक पुस्तकं, नाटकं, महाकाव्य, जात्युच्छेदक तसेच विज्ञाननिष्ठ निबंध, अंधश्रद्धा निर्मूलन संबंधी लेख अशा साहित्याची त्यांनी निर्मिती केली. बऱ्याच लोकांना ठाऊकही नसेल कि ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन वेळा अध्यक्ष राहिले होते. कमला हे महाकाव्य त्यांनी अंदमानच्या अंधारकोठडीत फक्त खिळ्याच्या सहाय्याने भिंतीवर कोरून लिहिले. अशा ह्या महान क्रांतिकारकाच्या स्मृतिदिनी वाचकांना त्यांच्या पुस्तकांची नाम ओळख आम्ही करून देत आहोत.
टीप : हे सर्व साहित्य आपण मोफत www.savarkarsmarak.com या संकेत स्थळावरून PDF फॉरमॅट मध्ये डाउनलोड करून आपल्या मोबाईल, कॉम्पुटर आणि टॅब वर वाचू शकता.
- सावरकरांचे साहित्य :
- हिंदुत्व,
- हुतात्म्यांनो!,
- आता मृत्युचे स्वागत करावे?,
- गांधी गोंधळ,
- आत्महत्या आणि आत्मार्पण,
- मित्रांनो रामराम !,
- १८५७ चे स्वातंत्र्यसमार,
- जोसेफ मेझिनी,
- सहा सोनेरी पाने,
- हिंदू पदपातशाही,
- आत्मचरित्र – पूर्वपीठिका,
- आत्मचरित्र – माझ्या आठवणी,
- लंडनची बातमीपत्रे,
- शत्रूच्या शिबिरात,
- माझी जन्मठेप,
- अंदमानच्या अंधेरीतून,
- अंदमानची इतिहास दर्शिका,
- हिंदू राष्ट्र दर्शन,
- हिंदुत्वाचे पंचप्राण,
- रणशिंग,
- ऐतिहासिक निवेदने,
- क्ष किरणे,
- गांधी हत्या अभियोगातील निवेदन,
- हिंदू संघटन – नेपाळी आंदोलन,
- जात्युच्छेदक निबंध,
- नासिक कटाच्या निर्णयातील एक उतारा,
- विज्ञान निष्ठ निंबध,
- सामाजिक भाषणे,
- तेजस्वी तारे,
- स्फुट लेख,
- बोधिवृक्ष,
- संगीत सन्यस्त खड्ग,
- संगीत उश्याप,
- संगीत उत्तरक्रिया,
- काळे पाणी,
- मला काय त्याचे?
- अर्थात मोपल्यांचे बंड,
- मराठी भाषेचे शुद्धीकरण आणि पर्यायी शब्दका,
- भाषा शुद्धी – लेख,
- ऐतिहासिक निंबध,
- स्वा. सावरकरांच्या कविता,
- कमला,
- गोमांतक
