खेलो इंडिया युवा स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राने पटकावला प्रथम क्रमांक
मुंबई, दि. १६: खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून अभुतपूर्व विजय मिळविला आहे. बिहार येथे ४ ते १५ मे दरम्यान पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण १५८ पदकांसह ५८ सुवर्ण, ४७ रौप्य व ५३ कांस्य पदक मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले. हरियाणाने जोरदार कामगिरी करत ३९ सुवर्ण आणि २७ रौप्य पदकांसह एकूण ११७ पदकं मिळवून दुसरे स्थान पटकावलं. राजस्थान २४ सुवर्ण पदकांसह ६० पदकं मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. तिरंदाजी, मल्लखांब, जलतरण, कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स अशा २६ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंनी अभूतपूर्व यश संपादन केलं. सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची काल सांगता झाली.
