बीड जिल्ह्यातल्या शिक्षक आत्महत्येप्रकरणी संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेत मागणी
मुंबई, दि. १७: बीड जिल्ह्यातल्या केज इथले शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली, त्यामुळे संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली. तसंच विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना वेतन देणं संस्थाचालकांना बंधनकारक करावं अशी सूचना केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं.
Source – AIR
