‘खो-खो विश्वचषक-२०२५’ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी राज्य शासनातर्फे दहा कोटी निधी मंजूर
मुंबई,दि. १२ : खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित “खो-खो विश्वचषक-२०२५” या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी “विशेष बाब” म्हणून दहा कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्देशानुसार याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे दि. १३ ते १९ जानेवारी, २०२५ या कालावधीत आयोजित “खो-खो विश्वचषक-२०२५” या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी हा निधी मंजूर केला आहे. यामुळे “खो-खो” खेळाला पाठबळ मिळाले आहे. खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेष बाब म्हणून तातडीने शासन निर्णय निर्गमित केला असल्याने “खो-खो” खेळाला पाठबळ मिळाले आहे.
