नमुमपा क्षेत्रातील नागरीकांसाठी किटकजन्य रोग व साथरोगाची विशेष शिबीरांचे महापालिकेकडून आयोजन
नवी मुंबई, दि. १९: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मा. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप / डेंगी आजारांबाबत जनजागृती होणे करीता जाहिर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत विविध ठिकाणी जाहिर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रमाणे गणेशोत्सव कालावधी, नवरात्रोत्सव कालावधी मध्ये हिवताप/डेंगी आजाराबाबत जनजागृती होणे करीता विषेश शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. अत्तापर्यंत एकुण ३४२ शिबिरांकरीता एकुण १,४९,८२६ नागरीकांनी भेट दिली असुन एकुण १३८१४ नागरीकांचे रक्तनमुने घेण्यात आले असता, तपासणी अंती सदरचे रक्तनमुने Negative असल्याचे आढळुन आले आहेत.
त्याअनुषंगाने कार्यक्षेत्रात जास्तीच जास्त नागरीकांपर्यंत पोहोचुन जनजागृती करणेकरीता दि. 20/12/2024 रोजी खालील प्रमाणे विशेष जाहीर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
अ.क्र ना प्रा आ केंद्र
1. सी बी डी, बाळतुबाई झोपडपट्टी, सेक्टर-21, सीबीडी.
2. करावे,से. २१, प्लॉट नंबर १८७,१८८, १९५,१९६ बांधकाम.
3. से-48, से.२५, ब्रिज खाली रेल्वे स्टेशन समोर.
4. नेरुळ 1, मोरेश्वर बांधकाम, सेक्टर १९अ, नेरुळ.
5. नेरूळ 2, पिरॅमिड बांधकाम, नेरूळ स्टेशन जवळ, नेरूळ पश्चिम.
6. कुकशेत, कोळीवाडा, सेक्टर-16 A, नेरुळ.
7. शिरवणे, घरत निवास, सेक्टर – 1.
8. सानपाडा, Try city बांधकाम, सेक्टर 8.
9. तुर्भे, नवनाथ अडागळे घरा समोर, रेड लाईट एरिया, के. के. रोड तुर्भे स्टोर.
10. पावणा, कॅपासाईट बांधकाम, से 19 , वाशी.
11. इंदिरानगर, D-५९, दूध धारा डेरी, तुर्भे एम आय डी सी.
12. जुहुगाव, ई व्ही होम्स बांधकाम, (श्रद्धा सो.) सेक्टर.१० वाशी.
13. वाशीगाव, गुणा बाई झोपडपट्टी, सेक्टर-३१(A) वाशी.
14. खैरणे, बेस्ट कॉलनी, समतानगर, बोनकोडे, कोपरखैरणे.
15. महापे, भीम नगर झोपडपट्टी, महापे एम आय डी सी .
16. घणसोली, गावदेवी चौक, घणसोली.
17. राबाडा, दिवागाव अंगणवाडी.
18. कातकरीपाडा, संभाजीनगर, दुर्गादेवी मंडप.
19. ऐरोली, समाज मंदिर, सेक्टर ४, ऐरोली
20. चिंचपाडा, देवीधाम मंदिर, देवीधाम नगर.
21. दिघा, शनी मंदिर झोपडपट्टी.
22. इलठणपाडा, रेशनिंग दुकान जवळ, सुभाषनगर.
23. नेासीलनाका, गोठिवली गाव, रत्नदीप बांधकाम.
24. घणसोली से-4, हनुमान मंदिर, सेक्टर ९, घणसोली.
25. कोपरखैरणे, से-14, sec15, भाजी मार्केट.
26. कोपरखैरणे, से-16, बुद्ध विहार, से – १९ सी, कोपरखैरणे.
उपरोक्त तक्त्यामध्ये नमुद ठिकाणी सर्व तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात येणार आहेत तसेच हिवताप/डेंग्यु या आजारांबाबत माहिती देण्यात येणार आहे. शिबिरांची वेळ सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 वाजे पर्यंत आहे.
हिवताप/डेंग्यु आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरीकांच्या प्रत्यक्ष सहभागाची आवश्यकता असुन, नमुंमपा कार्यक्षेत्रातील नागरीकांनी शिबिरांचा लाभ घ्यावा व ताप असल्यास रक्ताची तपासणी करुन घ्यावी तसेच हिवताप/डेंग्यु आजाराबाबत माहिती घ्यावी असे आवाहन मा. आयुक्त, डॉ. कैलास शिंदे, यांनी केले आहे.
