‘एक देश एक निवडणूक’ विधेयक लोकसभेत सादर; विरोधीपक्षांकडून विधेयकाला कडाडून विरोध
नवी दिल्ली, दि. १७: ‘एक देश एक निवडणूक’ संदर्भातली विधेयकं लोकसभेत मांडण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत संविधान दुरुस्ती विधेयक २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक २०२४ सभागृहात सादर करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इतर विरोधी पक्ष सदस्यांनी विरोध केला. हा संविधानाच्या मूलभूत रचनेवर हल्ला असल्याची टीका करत विरोधकांनी ही विधेयकं पुढच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली.
Source – AIR
