शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित
मुंबई, दि. ३०: विक्रमी बहुमताने निवडून महायुतीच्या तीनही पक्षांचा प्रतीक्षेचा अवधी आता संपल्यात जमा असून येत्या महायुती सरकारचा शपथविधी दि. ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मुंबईत आझाद मैदानावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही महायुती सरकारचा शपविधी ५ डिसेंबरला होणार असल्याची माहिती पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील असं पवार म्हणाले. विरोधकांचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्याचं खापर मतदान यंत्रावर फोडलं जात आहे, अशी टीका करत मतदान यंत्राबद्दल तक्रार करणं योग्य नाही असं पवार म्हणाले. मतदान यंत्रात घोटाळा झाला असेल तर तो सिद्ध करून दाखवला पाहिजे असंही पवार म्हणाले.
Source – AIR
