“जोशाबा समतापत्र” हा वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिध्द
पुणे, दि. ०५: जोतिबा, शाहू, बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित “जोशाबा समतापत्र” हा वंचित बहुजन आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आज प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुण्यात झालं. महिलांना मासिक ३५०० रुपये वेतन, ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या पारलिंगी व्यक्तींना ५ हजार रुपये मासिक वेतन, बेरोजगार सुशिक्षित तरुण तरुणींना २ वर्षापर्यंत ५ हजार रुपये भत्ता, घरगुती वापराची २०० युनिट वीज मोफत आणि ३०० युनिट वीज ज्येष्ठ नागरिकांना मोफत देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात आहे. सर्वांना KG ते PG मोफत शिक्षण, जात जणगणना करून मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी, बोगस आदिवासींचे दाखले रद्द करणे, हक्काच्या वन जमिनींचे वाटप ही आश्वासनही यात आहेत.
Source – AIR
