उद्या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील जाहीर सभेत होणार पक्षप्रवेश
सिंधुदुर्ग, दि. २२: खा. नारायण राणे यांचे पुत्र व रत्नागिरी-सिंधदुर्ग माजी खासदार निलेश राणे उद्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या पक्ष प्रवेशाबाबत माध्यमांना माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती नितेश राणे यांनी दिली. हे सगळं पक्षीय धोरण असल्याचं सांगून महायुतीच्या फार्म्युल्यानुसार पक्षप्रवेश करत असल्याचं राणे म्हणाले. भारतीय जनता पक्षासोबत आपले नेहमीच चांगले संबंध राहणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केल. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त केली.
येत्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या समोर विद्यमान आमदार वैभव नाईक यांचे तगडे आव्हान असणार आहे. निलेश राणे यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजप उमेदवार नारायण राणे यांना मोठं मताधिक्य लाभलं होतं.
