नागरिक फोन, व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेज किंवा ईमेलद्वारे याबाबत माहिती कळवू शकतात
मुंबई, दि. १८: आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक, २०२४ दरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभाग वचनबद्ध आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आणि निवडणुकीचे पावित्र्य कायम राखण्यासाठी, २४x७ कार्यरत असलेल्या निवडणूक खर्च देखरेख यंत्रणेचा समावेश असलेला नियंत्रण कक्ष मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला आहे. आदर्श आचारसंहिता लागू असेपर्यंत हा नियंत्रण कक्ष कार्यरत राहील. हा नियंत्रण कक्ष कर्तव्यनिष्ठ जनतेला आणि राज्यातील नागरिकांना निवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रोख आणि मौल्यवान वस्तूंबद्दल माहिती देण्यासाठी सक्षम बनवेल. खालील टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप नंबर किंवा टेक्स्ट मेसेज क्रमांक आणि ईमेलद्वारे नियंत्रण कक्षाला माहिती देता येईल :
टोल फ्री क्रमांक: 1800-221-510
व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेज क्रमांक: 8976176276/ 8976176776
ईमेल आयडी: mumbai.addldit.inv7@incometax.gov.in
नियंत्रण कक्षाचा पत्ता: खोली क्र. ३१६, तिसरा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१

