पाणी जपून वापरण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन
नवी मुंबई, दि. ३१: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत मोरबे धरणात २७ % इतका वापरायोग्य पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची पाणी पुरवठयाची गरज लक्षात घेता व भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुढील प्रमाणे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
Ø नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा.
Ø पाण्याचा अपव्यव टाळावा.
Ø वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरु नये.
Ø पाण्याच्या साठवण टाक्या भरुन वाहणार नाहीत (Overflow) याची दक्षता घेण्यात यावी.
Ø गरज नसताना घरातील पाण्याचे नळ बंद करावेत.
Ø भरुन ठेवलेले पाणी शिळे समजून ओतून देऊ नये.
Ø गळणारे नळ व पाईप ताबडतोब दुरूस्त करुन घ्यावेत.
Ø बांधकामासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करु नये.
वरीलप्रमाणे काळजी घेऊन पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
