लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यात कल्याण मतदारसंघात सर्वात कमी टक्के मतदान
मुंबई, दि. २१ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
धुळे – ५६.६१ टक्के
दिंडोरी – ६२.६६ टक्के
नाशिक – ५७.१० टक्के
पालघर – ६१.६५ टक्के
भिवंडी – ५६.४१ टक्के
कल्याण – ४७.०८ टक्के
ठाणे – ४९.८१ टक्के
मुंबई उत्तर – ५५.२१ टक्के
मुंबई उत्तर मध्य – ५१.४२ टक्के
मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७ टक्के
मुंबई दक्षिण – ४७.७० टक्के
मुंबई दक्षिण मध्य – ५१.८८ टक्के
