Earth Quake: पालघर मध्ये भूकंपाचे पुन्हा झटके
पालघर: महाराष्ट्रातल्या पालघर मध्ये आज शुक्रवारी सकाळी ५ वाजून ४१ मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. रिक्टर स्केल वर भूकंपाची तीव्रता ३.१ मोजली गेली आहे. हल्लीच काही दिवसांपूर्वी १२ मे ला पालघर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या दिवशी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी धक्के जाणवले होते. सध्या पालघर मध्ये छोटे भूकंपाचे धक्के बसण्याचे सत्र गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. त्यामुळे लोकं भयभीत झाली आहेत.
