राज्देयासह देशात कोरोनाच्या जेएन-१ प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ
मुंबई, दि. २८: देशात कोरोनाच्या जेएन-1 प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, एका दिवसात जेएन-1 व्हेरियंटचे १०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सने आपत्कालीन विभागात तपासणी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, गंभीररीत्या आजारी रुग्णांसाठी १२ जागा राखून ठेवल्या जाणार आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोविडच्या ५२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या ४ हजार ९७ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान राज्यात काल ८७ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत १९ नवे रुग्ण आढळले असून, पुणे शहर आणि सांगलीत प्रत्येकी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातल्या कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २६५ इतकी असून, जेएन-वन या प्रकारचा संसर्ग झालेल्यांची संख्या १० झाली आहे. तसंच केरळ, कर्नाटक, गुजरातसह दिल्लीमध्येही नव्या जेएन-वन प्रकारचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात ८७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून या विषाणूच्या संसर्गामुळे २ जण दगावले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत १९ नवे रुग्ण आढळले असून, पुणे शहर आणि सांगलीत प्रत्येकी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातल्या कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २६५ इतकी असून, विषाणूच्या जे एन १ या प्रकारचा संसर्ग झालेल्यांची संख्या १० झाली आहे. तसंच केरळ, कर्नाटक, गुजरातसह दिल्लीमध्ये नव्या जेएन-1 प्रकारचे रुग्ण आढळले आहेत.
Source – AIR
