Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘युजीसी’कडून एम.फिल ही पदवी मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सावधगिरी बाळगण्याबाबतचा इशारा

‘युजीसी’कडून एम.फिल ही पदवी मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सावधगिरी बाळगण्याबाबतचा इशारा

मुंबई, दि. २८: एम-फिल म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी या पदवीची मान्यता पूर्वीच रद्द करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी याबाबत सावधगिरी बाळगावी असा इशारा विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला आहे. या पदवीची मान्यता २०२२ मधेच काढून घेतली असतानाही काही विद्यापीठांमधे हा अभ्यासक्रम लावला जात असल्याचं निदर्शनाला आल्यावर आयोगाने यासंबंधी परिपत्रक जाहीर करुन खुलासा केला आहे. विद्यापीठांनी या पदवी अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश तातडीने थांबवावे असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. विद्यार्थ्यांनीही या पदवीसाठी प्रवेश घेऊ नये असं आयोगाने सांगितलं आहे. या मात्र पदवीची मान्यता काढून घेण्यापूर्वी ज्यांनी ती मिळवली असेल त्यांना पीएच डी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेतून सूट मिळण्याची सवलत कायम राहणार असल्याचं आयोगाच्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *