‘बशीर बद्र’ यांच्या शेर ची आठवण करत स्वराज यांची ममता बॅनर्जींना समज
नवी दिल्ली: पश्चिम बंगाल मध्ये पुरुलिया इथल्या एका प्रचारयात्रे दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ‘नरेंद्र मोदींना लोकशाहीचा जोरदार चपराक बसायला हवा’ या वक्तव्याचा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी समाचार घेतला आहे. ममता बॅनर्जींना इशारा देत सुषमा स्वराज म्हणाल्या की, तुम्ही साऱ्या रेषा पार केल्या आहेत. त्यांनी ममता बॅनर्जी यांना असे शब्द पुनः न वापरण्याबाबत ताकीद दिली. असे म्हणताना त्यांनी उर्दू शायर बशीर बद्र यांच्या एका शेराची आठवण करून दिली आहे. त्या आपल्या ट्विट मध्ये म्हणाल्या की, “ममता जी आज आपण साऱ्या हद्दी पार केल्यात. आपण राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. उद्या तुम्हाला त्यांच्याशीच बोलायचं आहे, यासाठी बशीर बद्र च्या एका शेर ची आठवण करून देत आहे:
“दुश्मनी जम कर करो लेकीन ये गुंजाईश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों.”
