अदानी समूहाच्या कथित गैरव्यवहाराचा केला उल्लेख
मुंबई, दि. ३१: विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आज आणि उद्या मुंबईत होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणणिती संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या आघाडीची समन्वय समिती, बोधचिन्ह आणि समान किमान कार्यक्रमाचा आराखडा या बैठकीनंतर घोषित होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांची इंडिया आघाडी ही स्वार्थी युती असल्याची टीका भाजपानं केली आहे. ही कोणत्या शक्तीची नाही, तर नाईलाजाची आघाडी आहे, असं भाजपाचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. अशा प्रकारची आघाडी यापूर्वी झाली होती. मात्र निवडणुकीच्या आधीच त्यांच्यात वादा-वादी सुरु झाली. या आघाडीत विपक्ष भ्रष्टाचारात गुंतले असून भ्रष्टाचारापासून जास्तीत जास्त फायदा मिळवणं हाच त्यांचा कार्यक्रम आहे, असा आरोप त्यांनी केला.
Source – AIR
