नवी मुंबईतील उष्माघात प्रकरणी चर्चे साठी दोन दिवसांचं विधिमंडळ अधिवेशन बोलावण्याची नाना पटोले यांची मागणी
मुंबई, दि. 19: नवी मुंबईत खारघर इथं महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळी झालेल्या १४ जणांच्या मृत्यूबाबत सखोल चर्चा होणं गरजेचं असून, त्यासाठी विधीमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं आहे.
हे मृत्यू सरकारच्या बेजबाबदार आणि नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून सरकार या घटनेतलं सत्य लपवत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष या घटनेतील सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी यासाठी येत्या २४ तारखेला राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन सत्य सांगणार आहे, असंही पटोले यांनी म्हटलं आहे.
Source – AIR
