नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याबाबत अजित पवार यांची आग्रही भूमिका
मुंबई, दि. 12: मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याबाबत विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. यासंदर्भात ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेत आहेत. या नुकसानग्रस्ताना शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये, तर फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची जाहीर करावी, अशी मागणी करणारं पत्र त्यांनी काल मुख्यमंत्र्यांना दिलं होतं.
वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या, तसंच पारस इथल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना एनडीआरएफमधून ४ लाख, आणि मुख्यमंत्री मदत निधीतून ६ लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे.
