उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दिली माहिती
मुंबई, दि. २४: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील दोन शहरांच्या नामांतराचा विषय आता मार्गी लागला आहे. केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
आपल्या ट्विट मध्ये ते म्हणाले की, “औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या नेतृत्वातील सरकारने ‘करून दाखवले’….!
➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…! pic.twitter.com/IfXbdFec7r— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023
आगामी काळात नामांतरावरून आता उद्धव ठाकरे व भाजप मध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळू शकते.
