राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही व्यक्त केली प्रतिक्रिया
नागपूर, दि.१२: राष्ट्रपती आणि केंद्र सरकारनं राज्यपाल बदलण्याचा समाधानकारक निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्वीच घ्यायला हवा होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर समाधान व्यक्त केलं आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच राज्यात नवीन राज्यपाल येणार असल्याच्या वृत्ताचं आम्ही स्वागत करतो, असं पाटील यांनी म्हटलं आहे. शिवसेनेनंही कोश्यारी यांच्या राजीनाम्याचं स्वागत केलं असून हा महाराष्ट्राचा विजय असल्याचं म्हटलं आहे.
Source – AIR
