“मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून प्रत्येकाला मुंबईतच यावं लागेल” – देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून प्रत्येकाला मुंबईतच यावं लागेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला होता. उद्योग आकृष्ट करायचे असतील किंवा गुंतवणूक परिषद आयोजित करायची असेल तर प्रत्येकाला मुंबईतच यावे लागते, ही आपली शक्ती आहे. खरे तर याचा आपल्याला अभिमान असायला हवा. शेवटी कुणी कुणाचेही उद्योग पळवू शकत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असं ते म्हणाले.
भाजपाच्या मिशन-45 संदर्भात त्यांनी सांगितलं की, मिशन-43 आम्ही दोन वेळा करून दाखवलं आहे. त्यामुळे मिशन-45 काय अवघड आहे? आम्ही तर मिशन-48 पण ठेऊ शकतो. पण, आपण लोकशाहीत काम करतो, असं ते म्हणाले.
Source – AIR
