अरुणाचल प्रदेशातील भारतीय व चीनी सैनिकांमधील चकमकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर चौफेर टीका
नवी दिल्ली, दि. १४: अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चीनसोबतचा व्यापार बंद करण्याची मागणी केली आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी (१४ डिसेंबर) ट्विट केले, “आम्ही चीनसोबतचा व्यापार का थांबवत नाही? चीनमधून आयात होणारा बहुतांश माल भारतात बनवला जातो. चीनला धडा मिळेल आणि भारताला रोजगार मिळेल.” तवांगमधील चकमकीवर सोमवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, आमचे सैनिक देशाची शान आहेत. मी त्यांच्या शौर्याला सलाम करतो आणि ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.
हम चीन से अपना व्यापार क्यों नहीं बंद करते?
चीन से आयात की जाने वाली अधिकतर वस्तुयें भारत में बनती हैं। इस से चीन को सबक़ मिलेगा और भारत में रोज़गार
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 14, 2022
नेमकं काय झालं होतं तवांग मध्ये
भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते की तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) ९ डिसेंबर रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती, ज्यामध्ये दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले होते. पूर्व लडाखमध्ये ३० महिन्यांहून अधिक काळ दोन्ही बाजूंदरम्यान सुरू असलेल्या सीमेवरील संघर्षाच्या दरम्यान, गेल्या शुक्रवारी या संवेदनशील सेक्टर (तवांग) मध्ये एलएसीवरील यांगत्सेजवळ चकमक झाली.
