घाऊक किंमत निर्देशांकावर(WPI) आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबरमधे ८ पूर्णांक ३९ शतांश टक्क्यांवर
मुंबई, दि. १४ : घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर जाहीर झाला आहे. हा दर ऑक्टोबर २०२२ मधे ८ पूर्णांक ३९ शतांश टक्के इतका झाला. मार्च २०२१ पासून प्रथमच हा दर एक १० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. सप्टेंबर २०२२ मधे हा दर १० पूर्णांक ७० शतांश टक्के होता.
अन्नपदार्थांचे दर ८ पूर्णांक ३३ शतांश टक्क्यांनी उतरले तर भाज्यांचे दर १७ पूर्णांक ६१ शतांश टक्के उतरले असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. इंधन आणि विजेच्या दरात ३२ पूर्णांक ६१ शतांश टक्के घसरण झाली तर कारखान्यात उत्पादित वस्तूंचे दर ४ पूर्णांक ४२ शतांश टक्के खाली आले.
Source – AIR
