Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रवादि कॉंग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप महिला पदाधिकार्‍यांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल

राष्ट्रवादि कॉंग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप महिला पदाधिकार्‍यांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल

ठाणे, दि. १४: महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे आमदार,  माजी गृहनिर्माण  मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात काल  रात्री उशिरा  मुंब्रा पोलीस  ठाण्यात  विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक उड्डाण पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्यावेळी आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार भाजपाच्या एका पदाधिकारी महिलेनं केली आहे.

या तक्रारीवरुन आव्हाड यांच्या विरोधात कलम ३५४ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा परिसरात निदर्शनं केली. काही कार्यकर्त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर आज सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *