सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी घेतली शपथ
नवी दिल्ली, दि. ९: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना शपथ दिली. हा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवन येथे संपन्न झाला. काल सेवानिवृत्त झालेले सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची जागा ते घेतील. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा जन्म १९५९ मध्ये झाला.
१३ मे २०१६ पासून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी नवी दिल्ली विद्यापीठातून एल एल बी ची पदवी घेतली तर अमेरिकेच्या हार्वर्ड लॉ स्कूल मधून एल एल एम तसंच ज्यूडिशिअल सायन्समध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड यांनीही दीर्घकाळ भारताचं सरन्यायाधीशपद भूषवलं होतं.
Source – AIR
