घटना दुरुस्ती विरोधात ४० याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या
न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी, बेला त्रिवेदी आणि जे. बी. पारदिवाला यांनी या आरक्षणाच्या बाजूनं, तर दोन न्यायाधिशांनी विरोधात मत नोंदवलं. हे आरक्षण घटनेच्या मूलभूत आराखड्याच्या विरोधात असल्याचं मत न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांनी व्यक्त केलं.
सरन्यायाधीश उदय लळित यांनीही न्यायमूर्ती भट यांच्याशी सहमती दर्शवली. तर, हे आरक्षण कोणत्याही प्रकारचा भेदभाव निर्माण करणारं नाही, असं मत न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी नोदंवलं. यामुळं समानतेच्या तत्त्वांना देखील बाधा पोचत नसल्याचं मत न्यायमूर्ती महेश्वरी यांनी नोदंवलं. या आरक्षणामुळं आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढेल, पण आरक्षणावर असणारी ही मर्यादा लवचिक स्वरुपाची आहे, असं ते म्हणाले. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या घटना दुरुस्तीला विरोध केला नव्हता. या घटना दुरुस्ती विरोधात ४० याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. तामिळनाडू सरकारनेही याविरोधात याचिका दाखल केली होती. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक आरक्षण आहे. या प्रकरणी सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने सलग सात दिवस सुनावणी घेतली होती.
