संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबई व दिल्ली येथे होणार
मुंबई, दि. १० : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीची बैठक २८ आणि २९ ऑक्टोबरला मुंबई आणि दिल्लीत होणार आहे. या बैठकीला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून या बैठकीत दहशतवादाला आळा घालण्यासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाबाबत चर्चा होणार आहे. ही बैठक २६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या मुंबईकरांना श्रद्धांजली ठरणार असल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीच्या अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अधिकारी या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांच्या स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करणार असल्याचंही त्यांनी बातमीदारांना सांगितलं. मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात १६० जण मृत्युमुखी पडले होते.
Source – AIR
