केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर येत आहेत तीन दिवसांच्या कल्याण डोंबिवली दौऱ्यावर
मुंबई/कल्याण : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि केन्द्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी आज डोंबिवली मतदारसंघातल्या भाजपाच्या मुख्य समितीला संबोधित केलं. ते कल्याण मतदार संघाच्या तीन दिवसांच्या आढावा दौऱ्यावर असून काल रात्री ते मुंबईत पोहचले. कल्याण मतदार संघात त्यांचं जागोजागी स्वागत करण्यात आलं.
ते लोकसभा मुख्य समितीच्या बैठकी बरोबरच युवा और महिला शाखेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत भाजपा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी या नंतर प्रसार माध्यमाशी बोलतांना व्यक्त केला.
