“आजादी का अमृत महोत्सव, हर घर (घरोघरी) तिरंगा, बुस्टर लसीकरण” या विषयावर सिताबर्डी मेट्रो स्टेशन येथे भव्य छायाचित्र प्रदर्शन
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूरचा उपक्रम
नागपूर, दि. १२ : सन १७०० पासून ते १९४७ पर्यन्तचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व महापुरूषांची माहिती, स्वातंत्र्य नंतरचा भारत एकसंघ करण्यासाठी केलेले प्रयत्न, भारताचा संविधान, स्वतंत्रता आंदोलनातील प्रमुख स्थळ अशी विविध प्रकारची माहिती सांगणारे भव्य छायाचित्र प्रदर्शन नागपूरकरांच्या भेटीला येत आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन १३ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, महामेट्रो, नागपूर आणि रस्ते वाहतूक व महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट २०२२ रोजी सिताबर्डी येथील मेट्रो जंक्शन येथे आजादी का अमृत महोत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सन प्रदर्शन लावण्यात येणार आहे. हे प्रदर्शन केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, रस्ते वाहतूक व महामार्ग प्राधिकरण आणि महामेट्रो, नागपूरच्या संयुक्त विद्यमाने मेट्रो जंक्शन, सिताबर्डी, नागपुर येथे आजादी का अमृत महोत्सव, हर घर (घरोघरी) तिरंगा, बुस्टर लसीकरण या विषयावरील हे प्रदर्शन १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत चार दिवस राहणार आहे. हे प्रदर्शन नागरीकांसाठी निःशुल्क असून नागरीकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
