उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नसल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. न्यायालयानं मंत्रिमंडळ विस्तार करण्यार प्रतिबंध केला नसल्याचं त्यांनी सांगितलं. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचं ते म्हणाले.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला राज्यातल्या जनतेनं कौल दिला आहे, हे ग्रामपंचायत निकालावरून स्पष्ट झालं असल्याचं फडणवीस म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपानं समाधानकारक कामगिरी केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनंही दुसऱ्या क्रमांकावर राहात उत्तम कामगिरी केल्याचं, त्यांनी सांगितलं.
भाजपाला आणखी बळकट करण्यासह आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत असलेल्या शिवसेनेच्या खासदारांना पूर्ण ताकदीनं निवडून आणू असं फडणवीस म्हणाले.
