अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वर्धा आणि गडचिरोलीत केंद्रीय पथक
वर्धा: गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे विदर्भात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर आहे. या एका पथकानं गडचिरोली तर दुसऱ्या पथकानं वर्ध्यात पाहणी केली. आज हे पथक चंद्रपूर जिल्ह्यातल्या नुकसानीची पाहणी करणार आहे.
वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील गोंदापूर, वर्धा तालुक्यात शिरसगाव, देवळी तालुक्यात सरुळ, बोरगाव इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी पाहणी केली. तसंच नुकसानग्रस्तांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. पथकातल्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी शेतकरी आणि नुकसानग्रस्त नागरिकांशी संवादही साधला. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव राजीव शर्मा यांच्या नेतृत्वाखाली वर्ध्यात आलेल्या या पाहणी पथकात जलशक्ती, ग्रामविकास, ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
