आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मेहुली घोष आणि शाहू तुषार माने जोडीनं पटकावलं सुवर्णपदक
या जोडीनं कझाकस्तानच्या इरिना लोकटोनोव्हा आणि व्हॅलेरी राखिमझान यांचा १६-० नं पराभव केला, ही लढत एकतर्फी ठरली. तुषारनं भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक जिंकलं आहे. तर मेहुलीनं काठमांडू इथं २०१९ च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यामुळे यंदा तिने दुसरं सुवर्णपदक मिळवलं आहे. भारताकडे आता दोन सुवर्ण आणि १ कांस्य पदकांसह भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी, भारताच्या अर्जुन बबुताने सोमवारी पुरुषांच्या एअर रायफलमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं.