स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पवार घराण्यावर मोदींची टीका : सुप्रिया सुळे
येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राज्यात अनेक ठिकाणी जात आपल्या प्रचार सभा घेत आहेत. काल मोदी यांनी वर्ध्यात आपली पहिली प्रचार सभा घेतली, त्या सभेत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबावर जोरदार टीका केली. आज राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, पवार कुटुंबीयावर टीका केल्याशिवाय आजवर कोणाला प्रसिद्धी मिळत नाही असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान हे कोणत्या पक्षाचे नसतात, ते फक्त देशाचे असतात. देशाचे पंतप्रधान सध्या देशात असलेल्या बेरोजगारी आणि महागाईवर बोलण्यापेक्षा त्यांना माननीय शरद पवार यांच्या कुटुंबावर बोलणे हे अधिक महत्वाचे वाटत आहे, मोदींकडून पवार कुटुंबावर करण्यात आलेली टीका ही दुर्दैवाची बाब आहे, असे देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
सभेत सर्वसामान्य जनतेच्या मुळ प्रश्नावर मुद्दाम दुर्लक्ष करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर कधी स्वस्त होणार आहे? असा सवालदेखील सुळे यांनी यावेळी मोदींना केला.
२०१४च्या निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, याविषयी मोदींनी एक शब्द काढला नाही. पंतप्रधान नेहमी देशाला दिशा देण्याचे काम करत असतात, असेही सुळे म्हणाल्या.
