वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाचा महाराष्ट्रासह ५ राज्यांना सावधानतेचा इशारा
हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र आणि मिझोराममध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आणि नवे रुग्ण आढळण्याच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या राज्यांना सावधानतेबाबत पत्रं लिहिली आहेत. या वाढत्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्याचा आणि त्याच्या प्रभावशाली व्यवस्थापनासाठी योग्य ती पावलं उचलण्याच्या सूचना त्यांनी या राज्यांना दिल्या आहेत. यासाठी चाचण्या,संशयित रुग्णांचा शोध, उपचार, लसीकरण आणि कोविडच्या नियमांचं पालन या पंचसूत्रीवर केंद्र सरकारचा भर आहे.
