राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप खासदार दिलीप गांधी यांच्यात राजकीय भेट
अहमदनगर: काँग्रेसचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल रात्री अहमदनगरमध्ये भाजप खासदार दिलीप गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांना डावलून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष राहत लढण्याची घोषणा केली.
दिलीप गांधी आणि आमचे घरगुती संबंध आहेत. हे माझंच घर आहे’ अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी भेटीनंतर दिली. दिलीप गांधी यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी आपण त्यांच्या घरी आलो असल्याचे ही विखे पाटील म्हणाले.
विखे पाटील आणि दिलीप गांधी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
