जाणते आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके – आशिष शेलार
निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोपाचे डाव चांगलेच रंगताना दिसत आहेत. त्यातच आज भाजपाचे मुंबईतील नेते आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, एक नातू म्हणाला आजोबा आजोबा निवडणुका तुम्हीच लढवा…दुसरा नातू म्हणाला आजोबा आजोबा मीच “पार्थ” मीच लढणार…आजोबांना होती ताईंची काळजी…दादांना पोराची.. जाणते आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके.. मुके.. आजोबांच्या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके.
गेल्या महिन्यात शरद पवार यांनी आपण माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचवेळी मावळ मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे सुद्धा प्रयत्नशील होते. नातवाच्या हट्टासाठी पवारांनी माघार घेतली आणि मावळमधून पार्थ पवार यांना संधी देण्यात आली.
एक नातू म्हणाला आजोबा आजोबा निवडणुका तुम्हीच लढवा…दुसरा नातू म्हणाला आजोबा आजोबा मीच "पार्थ" मीच लढणार…आजोबांना होती ताईंची काळजी…दादांना पोराची.. जाणते आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके.. मुके.. आजोंबाच्या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके!#ChokidarकेSideEffects
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 27, 2019
