Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रवादी काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध, छत्रपती उदयनराजेंच्या नावाचा उल्लेख नाही

Udayaraje 2

राष्ट्रवादी काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध, छत्रपती उदयनराजेंच्या नावाचा उल्लेख नाही

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपल्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर करण्यात व्यस्त आहेत. त्यातच बुधवारी (२७ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत शरद पवार यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. प्रफुल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक, नवाब मलिक, मधुकर पिचड यांसह अनके प्रमुख नेत्यांचा स्टार प्रचारकांमध्ये सहभाग आहे.

नुकतेच शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या अमोल कोल्हे यांच्या देखील नावाचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. परंतु या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेले नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती उदयनराजे यांचे महाराष्ट्रभर चाहते आहेत. सोशल मीडियावर देखील उदयनराजे यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. असं असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

तसेच उदयनराजे यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळल्याने त्यांच्या फॉलोवर्सनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीला उदयनराजे यांचा विसर पडल्याची भावना त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *