पालघर नगरपरिषद निवडणुकीत युतीला बहुमत मात्र नगराध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे
पालघर : पालघर जिल्हा स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाई युतीने दणदणीत विजय मिळवत २१ जागांवर झेंडा फडकवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने २ व अपक्षांनी ५ जागा जिंकल्या. पण नगराध्यक्ष निवडणुकीत विपरीत चित्र पाहायला मिळालं. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे या निवडून आल्या आहेत. १४ प्रभागांमधील २८ जागांवर ९० उमेदवार या निवडणुकीत उभे होते.
नगरपरिषदेच्या निवडणूक निकालामुळे युतीची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे.
