नव्या विषाणूमुळे कोविड संक्रमण वाढलं तरी जगातल्या सर्व शाळा बंद करायचा निर्णय टाळणंच श्रेयस्कर असल्याचं युनिसेफचं मत
ओमायक्रॉन विषाणूच्या झपाट्यानं होत असलेल्या प्रसारामुळे टाळेबंदी लागू करण्याची वेळ आली तरी जगातल्या सर्व देशांनी शाळा बंद करण्याचा निर्णय शक्यतो टाळावा असं युनिसेफनं म्हटलं आहे.
कोविड विषाणूचं सामुदायिक संक्रमण होत असताना सार्वजनिक आरोग्याबाबत कडक निर्बंध लागू करणं आवश्यक असतं.मात्र अशा वेळी शाळा बंद करण्याचा निर्णय सर्वात शेवटी घ्यायला हवा असं युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरीएटा फोर यांनी म्हटलं आहे.
ओमायक्रोन विषाणूच्या फैलावामुळे वाढत असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातले अनेक देश सरकारी शाळा उघडण्याबाबत फेर विचार करत आहेत. मात्र कोरोनामुळे जग आधीच काही दशकं मागे गेलं आहे, अशा वेळी शाळा बंद ठेवल्यानं मुलांचं सर्वात जास्त नुकसान होईल असं फोर यांनी सांगितलं.
