जल जीवन मिशनसाठी केंद्राकडून राज्याला आणखी निधीची तरतूद
ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाचं शुद्ध पाणी पुरवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या जल जीवन मिशनसाठी केंद्र सरकारनं राज्याला आणखी १ हजार ६६६ कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत सुमारे ७ हजार कोटी रुपये देण्यात आले असून हा निधी २०२०-२१ या वर्षात दिलेल्या निधीच्या चौपट असल्याचं जल शक्ती मंत्रालयानं म्हटलं आहे.
राज्याच्या ग्रामीण भागात सुमारे १ कोटी ४२ लाख ३६ हजार घरं असून त्यापैकी ९६ लाख घरांना नळानं पाणी पुरवलं जात आहे. २०२१-२२ या वर्षात सुमारे २७ लाख घरांना नळाद्वारे पाणी देण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे.
