परभणीत राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का
पुुणे: सुजय विखे पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी एक नेत्याचा मुलगा भाजपच्या वाटेवर आहे. परभणीत राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
समीर दुधगावकर यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते.
गणेश दुधगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मागच्या वेळी राष्ट्रवादीने विजय भांबळे यांना तर यावेळी राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आहे. यंदाही लोकसभेची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी दुधगावकर यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यांचा प्रयत्न यश आले नाही त्यामुळे नाराज झालेले गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर यांनी राष्ट्रवादीला सोठचिठी देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.
