Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या आशीर्वादाने रणजितसिंह भाजपमध्ये – मुख्यमंत्री

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या आशीर्वादाने रणजितसिंह भाजपमध्ये – मुख्यमंत्री

मुंबई: राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील गरवारे हॉल येथे भाजपमध्ये प्रवेश केला.
विजयसिंह मोहिते-पाटलांच्या आशीर्वादने रणजितसिंह भाजपमध्ये आले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह यांच्या पक्ष प्रवेशावेळी सांगितले. विजयसिंह मोहिते-पाटीलही मनाने भाजपामध्येच आहेत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महाराष्ट्राचे राजकारण मोहिते-पाटील घराण्याशिवाय अपूर्ण आहे, त्याच मोहिते पाटील घराण्याची तिसरी पिढी आज भाजपसोबत जोडत असल्याने मला खूप आनंद होत आहे.

तसेच माढ्यात भाजपचाच खासदार निवडून येईल, मोहिते-पाटील घराण्याचा मान भाजपामध्ये कधीही कमी होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांना दिला.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पश्चिम महाराष्ट्रात भाजप सरकार अजून मजबूत होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *